चंदगड येथील तजमुल फणीबंद समाजरत्न पुरस्काराने सन्मानित - चंदगड लाईव्ह न्युज

10 September 2021

चंदगड येथील तजमुल फणीबंद समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

                       

तजमुल सलीम फणीबंद

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
         चंदगड येथील तजमुल सलीम फणीबंद यांना नुकताच मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी चा राज्यस्तरीय कार्यगौरव समाजरत्न पुरस्कारा(स.न.२०२०-२१) साठी गौरविण्यात आले.                               मनुष्यबळ विकास अकादमी पुणे, यांच्या मार्फत दिला जाणारा राज्य स्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार  साठी चंदगड येथील अंजुमन-ए-इस्लाम चॅरिटेबल ट्रस्ट चे  तजमुल सलीम फणीबंद यांनी स.नं.१९९६ पासून सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख निर्माण केली आहे, सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी सामाजिक कार्यात सहभागी होवून  विविध  उपक्रम राबविले आहेत जसे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शुभेच्छा, एक दीया शहीदों कें नाम, चंदगड येथे कोवीड निर्मुलन साठी उपचार केंद्राची ट्रस्ट च्या माध्यमातून   सुरुवात अशा विविध उपक्रमांत हिरीहीरीने सहभाग घेऊन सहकार्य केले आहे फणीबंद यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन पुणे येथील मनुष्यबळ विकास अकादमी कडून नुकताच त्यांचा समाजरत्न पुरस्काराने  गौरव करण्यात आला आहे.गौरवाप्रत्यार्थ फणीबंद यांनी जिल्ह्यातील सर्व समाज बांधव तसेच अंजुमन-ए-इस्लाम चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्व सहकाऱ्यांनी दिलेल्या प्रोत्साहन मुळे आपल्याला  हा सन्मान मिळाला आहे असे सांगितले.


No comments:

Post a Comment