आप्पाराव पाटील यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

31 December 2021

आप्पाराव पाटील यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

आप्पाराव पाटील

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या 'नवोपक्रम स्पर्धा २०२१-२२' मध्ये आप्पाराव ओमाणा पाटील यांच्या उपक्रमाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्या मंदिर किणी (ता. चंदगड) येथे पदवीधर शिक्षक असलेले आप्पाराव पाटील कालकुंद्री, ता. चंदगड गावचे आहेत.

          'एका क्लिकवर १०० वर्षांचे दाखले' ही जनरल रजिस्टर मधील दाखले देण्यासाठीची तंत्रस्नेही संकल्पना या नवोपक्रमातून त्यांनी मांडली आहे. मागील आठवड्यात जिल्हा स्तरासाठी निवड झालेल्या या उपक्रमाची 3 जानेवारी रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही संकल्पना इतर शाळांमध्ये पोचवण्यासाठी त्यांनी नुकतीच प्राथमिक व माध्यमिक शाळा मुख्याध्यापक यांची कार्यशाळा आयोजित केली होती. चार वर्षापुर्वी व्हिएतनाम येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करून यश संपादन केले होते.

No comments:

Post a Comment