ताम्रपणी नदीपात्रात मगरीचे दर्शन, नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्कता बाळगावी - चंदगड लाईव्ह न्युज

31 December 2021

ताम्रपणी नदीपात्रात मगरीचे दर्शन, नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्कता बाळगावी

ताम्रपर्णी नदीपात्राबाहेर गवतामध्ये किनाऱ्यावर ऊन्हामध्ये पहुडलेली मगर.


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       कुर्तनवाडी (ता. चंदगड) या गावाशेजारी असलेल्या ताम्रपणी नदीपात्रात मगरीचे दर्शन झाले आहे. कुर्तनवाडी हद्दीत असणाऱ्या व कोनेवाडी बंधाऱ्यापासून नजीक असणाऱ्या मळवी नावाच्या शेताजवळनदीच्या पात्राबाहेर गवतामध्ये मगरीचे दर्शन झाले. मगरीचे चित्र कॅमेरात कैद झालेलं आहे. या नदीवर सकाळी व सायंकाळच्या दरम्यान अनेक शेतकरी जनावरे धुण्यासाठी जात असतात. या सर्वांनी सतर्कता बाळगणं गरजेचं आहे. 

No comments:

Post a Comment