उत्साळी घटप्रभा सेवा सोसायटीवर आमदार राजेश पाटील गटाची सत्ता - चंदगड लाईव्ह न्युज

30 December 2021

उत्साळी घटप्रभा सेवा सोसायटीवर आमदार राजेश पाटील गटाची सत्ता

                    उत्साळी येथे विकास सेवा संस्थेच्या निवडणूकीत विजयी झालेले उमेदवार व  त्यांचे समर्थक

अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

         उत्साळी (ता. चंदगड) येथील घटप्रभा ग्रुप विकास सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीत माजी आमदार कै. नरसिंगराव पाटील शेतकरी विकास आघाडीने सर्वच्या सर्व ११ जागा जिंकून निर्विवार वर्चस्व मिळवले. त्यामुळे या सेवा संस्थेवर आमदार राजेश पाटील गटाची सत्ता सत्तेत कायम राहीली आहे. या निवडणूकीत ६१८ पैकी ४७८ मतदारानी आपला मतदानाचा हक्क बजावला. 

विजयी उमेदवार पुढील प्रमाणे - *सर्वसाधारण कर्जदार* *खातेदार गट -*भिकाजी कोले , भैरू घोळसे , गणपती चौगुले , गोपाळ पाटील , लक्ष्मण पाटील , शामराव देसाई , मंगल देसाई, जानबा शिंदे

*इतर मागास प्रतिनिधी* तुकाराम लक्ष्मण पाटील

*माहिला राखिव -* लता देसाई , सुवर्णा मटकर

या सर्व उमेदवारांच्या विजयासाठी संतोष देसाई, पुंडलिक घोळसे आदिनी परिश्रम घेतले. 

No comments:

Post a Comment