सिंदखेड राजा येथे कीर्तन महोत्सव, जिजाऊ जन्मदिनी ११ व १२ जानेवारीला आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

30 December 2021

सिंदखेड राजा येथे कीर्तन महोत्सव, जिजाऊ जन्मदिनी ११ व १२ जानेवारीला आयोजन

वारकरी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गंगाधर महाराज कुरुंदकर (हिंगोली)

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टी मातृतीर्थ वर कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ११ व १२ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या या महोत्सवात महाराष्ट्रातील शिवप्रेमी कीर्तनकारांना समाजप्रबोधनपर कीर्तन सादर करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. मराठा सेवा संघ प्रणित 'संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद' च्या वतीने किर्तनकारांसाठी हे आंतरराष्ट्रीय विचारपीठ

 उपलब्ध करून देण्यात आले आहे.

         यासाठी नोंदणी शुल्क म्हणून भजनी मंडळ संचासह रु. १ हजार, तर संचाशिवाय एकटे कीर्तनकार असल्यास रु. २ हजार ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांतून केवळ ५१ कीर्तनकारांना कीर्तनाची संधी मिळेल.

           स्पर्धेतील उत्कृष्ट कीर्तनकार, उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट वादक, उत्कृष्ट ग्रंथ वाचक, उत्कृष्ट ग्रंथ सुचक, पालखी सोहळ्यातील उत्कृष्ट देखावा दिंडी या सहा विभागातील अनुक्रमे ३ विजेते निवडून विजेत्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत. इतरांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल, महोत्सवातील कीर्तने शिवशृष्टी वरील लाखो शिवप्रेमी ऐकणार असून सर्व प्रकारच्या प्रसार माध्यमातून जगभर पोहोचणार आहेत. सहभाग प्रशस्तीपत्राचा उपयोग महाराष्ट्र शासनाच्या 'कलावंत पेन्शन' प्रस्ताव करता येईल. अशी माहिती वारकरी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप गंगाधर महाराज कुरुंदकर यांनी दिली असून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

           १२ जानेवारी सकाळी ६ ते ९  राजवाडा ते जिजाऊ सृष्टी मार्गावर भव्य वारकरी दिंडया व पालखी सोहळा असेल. तर जिजाऊ जन्माचा व शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा (शिवायण) ग्रंथ पारायणाचा कार्यक्रम जिजाऊ सृष्टी वरील वारकरी विचार मंचावर असेल. या ग्रंथ पारायण कार्यक्रमात जास्तीत जास्त शिवप्रेमी ग्रंथ वाचक, सुचक यांनी कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

नावे नोंदणीसाठी

            हभप गंगाधर महाराज कुरुंदकर 9423102597, गणेश महाराज कापशीकर- 9922356129, ज्योतीताई जाधव- 9423743216, सोमनाथ महाराज-  9921925671 या नंबर वर संपर्क साधावा. प्रवेश शुल्क व देणग्या खालील बँक खात्यात जमा कराव्यात असे आवाहन करण्यात आलेले आहे.

SBI AC No. 62316951254, IFSC Code. SBIN0021723

No comments:

Post a Comment