महादेव चौगुलेची बांबू उडीत सुवर्णपदकाला गवसणी - चंदगड लाईव्ह न्युज

30 December 2021

महादेव चौगुलेची बांबू उडीत सुवर्णपदकाला गवसणी

 महादेव चौगुले

महागाव : सी. एल. वृत्तसेवा 

          कराड (जि. सातारा) येथे झालेल्या अंतर विभागीय मैदानी स्पर्धेतील बांबू उडी प्रकारात महागावच्या महादेव शिवाजी चौगुले याने सुवर्ण पदक पटकावले. तो गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. चंदगड, आजरा, गडहिंग्लज उपविभागात प्रचलित क्रीडाप्रकार सोडून 'बांबू उडी' सारख्या वेगळ्या प्रकारात लौकिक मिळविल्यामुळे 'महादेव'च्या यशाला नावीन्याची किनार दिसून येते. त्याला या कामी महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक मगदूम, छत्रपती शिवाजी विद्यालयाचे अध्यापक वासू पाटील यांच्यासह निलेश रोकडे आदींचे मार्गदर्शन तर वडील शिवाजी व काका निवृत्त स. पोलीस निरीक्षक पांडुरंग चौगुले व कुटुंबियांचे प्रोत्साहन लाभले.

No comments:

Post a Comment