डुक्करवाडी येथे पशुसंवर्धन शिबीर संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

28 May 2022

डुक्करवाडी येथे पशुसंवर्धन शिबीर संपन्न

 

डुक्करवाडी (रामपूर)येथे पशुसंवर्धन दिनानिमित्त आयोजित शिबिरात जनावरांच तपासणी करताना डाॅ पवार,बाजूल शेतकरी

चंदगड/प्रतिनिधी
पशुसंवर्धन दिनानिमित्त डुक्कवडी (रामपूर)ता.चंदगड येथे जि.प व पं.स.समिती व माणगाव पशुवैद्यकीय दवाखान्याच्या संयुक्त सहकार्याने पशुसंवर्धन वधंत्व उपचार व लसीकरण शिबीर संपन्न झाले.जनावरांची तपासणी करून औषधोपचार व लसीकरणही करण्यात आले.यावेळी शेतकऱ्यांना दुध वाढ, व वैरण,जंत आदी बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ एस एस पवार  अरुण गुरव,सुरेश हरेर,सचिन नांगरे, डाॅ.पी एच शिवणगेकर आदीनी जनावरांची तपसणी केली. मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी या शिबीराचा लाभ घेतला. No comments:

Post a Comment