अनुजा दत्तात्रय लोहार |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुका मराठी अध्यापक संघ व वेद इन्स्टिट्यूट यांच्या वतीने आयोजित चंदगड तालुका स्तरीय काव्यवाचन स्पर्धेत अनुजा दत्तात्रय लोहार हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिने स्वतः लिहिलेल्या 'काय माहित कधी सुरू होणार शाळा!' या कविता वाचनाला हे पारितोषिक मिळाले. तिने नुकत्याच पिरनवाडी, तालुका बेळगाव येथे छत्रपती शिवस्मारक सेवा समितीच्या वतीने आयोजित ऐतिहासिक वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक तसेच कालकुंद्री, ता. चंदगड येथील भिमक्रांती युवक मंडळ आयोजित वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. निट्टूर, ता. चंदगड येथील नरसिंह हायस्कूलची ती विद्यार्थिनी आहे. तिला याकामी शिक्षक व वडील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
No comments:
Post a Comment