तेऊरवाडी (एस. के. पाटील)
गोव्याला फिरायला गेलेल्या चंदगड तालुक्यातील ११ तरुणांना एका खोलीत कोंडून त्यांचा व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल करत लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. २६) गोव्यात घडली असून या घटनेनंतर पीडित तरुण गेले दोन दिवस भीतीच्या छायेत असून त्यांना संरक्षण द्यावे अशी मागणी चंदगड पोलिसात केली आहे.
या घटनेने गोवा पर्यटनासाठी जाणाऱ्या मध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे .
अधिक माहिती अशी की, चंदगड तालुक्यातील ११ तरुण गोव्याला फिरायला गेले होते. गोवा फिरून झाल्यानंतर गुरुवारी घरी परतत असताना गोव्यातील काही अज्ञातांनी त्यांना बोंडगेश्वर मंदिराशेजारी अडविले. आमच्या हॉटेलमध्ये चांगल जेवण मिळेल अशी फुस लावून त्यांना एका खोलीत कोंडले. त्याचबरोबर त्या सर्वाना मारहाण करून, व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं. त्यांच्याकडून पैसे, मोबाईल, सोन्याची अंगठी व चेनही काढून घेतले. तसेच सोडणार नाही अशी धमकी देत त्यांच्याकडून ऑनलाईन पैसे देखील उकळले. हि घटना कुणाला सांगितल्यास तुमचे उघडे व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल करू आणि जिवंत सोडणार नसल्याची धमकी दिली. या संपूर्ण प्रकरणे हे सर्व तरुण हादरले असून गेल्या दोन दिवसापासून भीतीच्या छायेत व प्रचंड तणावाखाली आहेत. त्यानंतर अज्ञातांच्या तावडीतून कशीबशी सुटका करुन हे तरुण गावी आले आहेत. अखेर आज (शनिवारी) या तरुणांनी आपल्याबरोबर झालेल्या या रॅगिंग प्रकाराची माहिती अँड. संतोष मळविकर यांना सांगितली. त्यानंतर सविस्तर चर्चा करून सर्वांनी चंदगड पोलीस ठाणे गाठत संरक्षणासाठी निवेदन दिले. या निवेदनावर अँड. संतोष मळविकर, समीर शिंदे, सतीश आपटेकर, सुभाष गावडे, सुभाष गावडे, प्रविण पाटील,
अभिषेक पाटील, निखिल गावडे, नितीन गावडे, रोहित गावडे,मनोज शिंदे, सागर हसूरकर यांच्या सह्या आहेत.
No comments:
Post a Comment