स्फूर्तीसाहित्य संघाचे 'श्रीशब्द' काव्यपुरस्काराने ६ कवींचा होणार सन्मान - कवी सुभाष पाटील, प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार यांची माहिती - चंदगड लाईव्ह न्युज

09 June 2022

स्फूर्तीसाहित्य संघाचे 'श्रीशब्द' काव्यपुरस्काराने ६ कवींचा होणार सन्मान - कवी सुभाष पाटील, प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार यांची माहिती

कागणी / सी. एल. वृत्तसेवा

        नेज (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील स्फूर्ती साहित्य संघ व पोतदार परिवार यांचेमार्फत कै. सत्यभामा भगवंत पोतदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिले जाणारे 'श्रीशब्द' काव्य पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. जानेवारी २०२१ते डिसेंबर २०२१ या कालावधीतील पुरस्कारासाठी कवितासंग्रह कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, पुणे, सातारा, बेळगांव, कोकण, अमरावती, मुंबई, नाशिक, अकोला अशा अनेक ठिकाणाहून उत्स्फुर्तपणे  कवितासंग्रह प्राप्त झाले. कवी सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील समितीने नुकताच आपला निकाल दिला. यामध्ये प्रतिभा सराफ (उमलावे आतूनीच ग्रंथाली, मुंबई) ₹.१०००/- व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, लक्ष्मण महाडिक (स्त्रीकुसाच्या कविता शब्दालय, श्रीरामपूर) ₹. १०००/- व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्कार जाहीर झाले. याशिवाय विशेष पुरस्कार प्रत्येकी ₹. ५००/- व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र. डॉ. राजश्री पाटील (ती अजूनही जळत आहे - ग्रंथाली, मुंबई) रमजान मुल्ला - (अस्वस्थ काळरात्रीचे दृष्टांत - गोल्डन पेज, पुणे), डॉ. बी. एम. हिर्डेकर -(ऋतुरंग - भाग्यश्री, कोल्हापूर), प्रशांत केंदळ-(गुलमोहराचं कुकू- चपराक, पुणे) असे पुरस्कार जाहीर झाले आहेत. लवकरच पुरस्कार वितरण समारंभपूर्वक करणार असल्याचे स्फूर्ती साहित्य संघाचे अध्यक्ष कवी प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment