कागणी : सी. एल. वृत्तसेवा
बेळगावच्या वारकरी महासंघा तर्फे यंदा आयोजित आळंदी ते पंढरपूर दिंडी सोहळ्या बाबत चंदगड आजरा गडहिंग्लज तालुक्यामध्ये वारकऱ्यांमध्ये जागृती दौरा केला.
महासंघाचे अध्यक्ष ह. भ. प. भाऊसाहेब पाटील महाराज यांच्या मार्गदर्शनाने प्रभाकर सांबरेकर, शंकरराव बाबली, एस आर पाटील, अशोक हारकारे, रवळू कणबरकर, परशराम किणेकर, ज्योतिबा मोरे, तुकाराम शिंदे, सुबराव हारकारे,प्रभाकर काकडे,वामन सामजी बाबू लाड यांनी चंदगड आजरा गडहिंग्लज बेळगाव खानापूर इत्यादी तालुक्यात फिरून येत्या 21 जून रोजी प्रस्थान होणाऱ्या ज्ञानेश्वर माउलींच्या आळंदी पंढरपूर पालखी दिंडी सोहळ्या संदर्भात जागृती करून बहुसंख्येने दिंडीत सहभागी होण्याचे अवाहन करत महासंघाचा अहवाल, कार्यक्रम पत्रिका व पावती पुस्तकांचे वाटप केले. यासंदर्भात मोठ्या संख्येने वारकऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून चालू झाली दिंडी सोहळ्यात वारकरी भाविकांची मोठ्या संख्येने वाढ होण्याची शक्यता महासंघाचे खजिनदार ह भ प प्रभाकर सांबरेकर यांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment