चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
जांबरे प्रकल्प येथे तयार होणारी 33000 KVA वीज ही उमगाव (ता. चंदगड) येथील शेताच्या मध्यभागात खांबे उभे करून चंदगडला जोडली जात आहे. सदरील खांबे शेतात मारल्याने शेतीची मशागत करताना अडचणी निर्माण होत आहेत, भविष्यात त्याची दुरुस्ती करताना शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे हे खांबे जांबरे-चंदगड रस्त्यालगत मारून शेतीचे होणारे नुकसान टाळावे अन्यथा आम्ही जनआंदोलन उभे करण्याचा इशारा उमगाव ग्रामस्थांना दिला आहे. याबाबतचे निवेदन तहसिलदार व एमएसईडीसीएल चंदगडचे उपमुख्य कार्यकारी अभियंता यांना दिले आहे.
No comments:
Post a Comment