आत्मविश्वास ही दैवी शक्ती आहे - माजी प्राचार्य एस. व्ही. गुरबे, दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नवागतांचे स्वागत व सांस्कृतिक मंडळाचे उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

07 August 2022

आत्मविश्वास ही दैवी शक्ती आहे - माजी प्राचार्य एस. व्ही. गुरबे, दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नवागतांचे स्वागत व सांस्कृतिक मंडळाचे उद्घाटन

 

नवागतांचे स्वागत करताना माजी प्राचार्य एस. व्ही. गुरबे 

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

            "जिद्द , कष्ट आणि संकटाशी सामना करण्याची मानसिकता ठेवल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यासाठी आपल्यात आत्मविश्वास हवा .आत्मविश्वास ही दैवी शक्ती आहे. आत्मविश्वाच्या जोरावर आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. म्हणून कधी ही आत्मविश्वास गमावू नका". असे प्रतिपादन  माजी प्राचार्य एस. व्ही. गुरबे यांनी केले. ते खेडूत शिक्षण मंडळाच्या  दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्यु कॉलेजमध्ये सांस्कृतिक मंडळाचे उद्घाटन व नवगतांचा स्वागत सोहळा कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

            कार्यक्रमाकाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. पी. पाटील होते. प्रास्ताविक प्रा. सौ. एम. एम. आमणगी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय एम. व्ही. कानूरकर यांनी करून दिला. 'मुलांनी आपले ध्येय निश्चित करून वाटचाल केल्यास यश निश्चित मिळते त्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागते' असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एम. एम. तुपारे यांनी मानले. "उदात्त स्वप्ने उराशी बाळगून त्यांचा पाठलाग केल्यास आपण यश मिळवू शकतो " असे मत एस. जी. सातवणेकर यांनी मांडले.

       यावेळी आयडीयल स्टुंडट म्हणून राजवर्धन कांबळे, कु. श्रध्दा कानूरकर तर आयडीयल सीआर म्हणून आर्य गवस यांना सन्मानित करण्यात आले. इंग्रजी भाषण स्पर्धेत मोठ्या गटात अनुक्रमे गौतमी वाडकर, नाईकवाडी' वैष्णवी तोरस्कर तर लहान गटात आर्या निळकंठ, निधी पाटील, रिया मूजावर यांनी क्रमांक पटकावले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

          कार्यक्रमाला संस्थेचे सचिव 'प्रा. आर. पी. पाटील, सहसचिव एल. डी. कांबळे,  रमेश गावडे, चंद्रकांत कुट्रे,  सुप्रिया गावडे, प्रा. बी. डी. मोरे, प्रा. ए. डी. धायगुडे, प्रा. एस. एम. निळकंठ, टी. एस. चांदेकर, व्ही. के. गावडे, जे. जी. पाटील, टी. टी. बेरडे, डी. जी. पाटील, एस. जे. शिंदे, शरद हदगल, पुष्पा सुतार, विद्या डोंगरे, विद्या शिंदे, टी. व्ही. खंदाळे, सूरज तुपारे, रवि कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साबळे यांनी तर आभार बी. आर. चिगरे यांनी  मानले.

No comments:

Post a Comment