राष्ट्रीय एकता या संकल्पनेवर मराठा लाईट इंन्फट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे शालेय विद्यार्थ्यासाठी मिनी मॅरेथॉनचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

07 August 2022

राष्ट्रीय एकता या संकल्पनेवर मराठा लाईट इंन्फट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे शालेय विद्यार्थ्यासाठी मिनी मॅरेथॉनचे आयोजन

मॅरेथाॅन स्पर्धेत सहभागी स्पर्धक.

बेळगाव / सी. एल. वृत्तसेवा

        बेळगाव येथील मराठा लाईट इंन्फट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे शालेय विद्यार्थ्यासाठी मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. मराठा लाईट इंन्फट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी ध्वज दाखवून मिनी मॅरेथॉन स्पर्धेला चालना दिली. 

       बेळगावातील विद्यार्थ्यांमध्ये देशाभिमान आणि. देशभक्तीची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या निमित्ताने राष्ट्रीय एकता या संकल्पनेवर मिनी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मुले आणि मुली अशा दोन गटात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

         तेरा ते सतरा वर्षे वयोगटातील शेकडो विद्यार्थी मिनी मॅरेथॉन स्पर्धेत उत्साहाने सहभागी झाले होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी पाच किलोमीटर अंतर यशस्वीरीत्या पूर्ण केले. विजेत्या स्पर्धकांना ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेत सहभागी होवून देशप्रेमाचे दर्शन घडवल्या बद्दल सगळ्या स्पर्धकांचे अभिनंदन जॉयदीप मुखर्जी यांनी केले.

No comments:

Post a Comment