मुंबई येथील जैव इंधन परिषदेत बेळगावातून तिघांचा सहभाग - चंदगड लाईव्ह न्युज

08 August 2022

मुंबई येथील जैव इंधन परिषदेत बेळगावातून तिघांचा सहभाग

विशाल कोडते               श्रीनिवास धोत्रे               प्रवीण पाटील

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

           मुंबई येथे जागतिक जैव इंधन दिनानिमित्त बुधवार दि. १० रोजी जैव इंधन परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत बेळगाव येथील  विशाल कोडते, तर खानापूर तालुक्यातील श्रीनिवास धोत्रे, प्रवीण पाटील सहभागी होणार आहेत. 

         केंद्र सरकार तर्फे येत्या काही वर्षात जैव इंधन क्षेत्रामध्ये भारत देशाला स्वयंपूर्ण करण्याचे धोरण आहे. याबाबत देशभर विविध ठिकाणी जैवइंधन निर्मिती प्रकल्प सुरू करणे त्याची जागृती करणे, यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून या जैव इंधन परिषदेमध्ये नवीन प्रकल्प याबाबत तज्ञ व उद्योजक यांच्यात परिसंवाद होणार आहे.  

         देशभरातील तज्ञ या परिषदेमध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत. प्राथमिक पहिल्या प्राथमिक टप्प्यात बेळगाव जिल्ह्यामध्ये बेळगाव व खानापूर या ठिकाणी जैव इंधन निर्मिती साठी केंद्र सरकारच्या सहकार्यातून प्रयत्न होणार आहेत.

No comments:

Post a Comment