न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पुष्पगुच्छ प्रदर्शनाची पाहणी करताना नगरसेवक गुरबे व शिक्षक. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
मुलांची सौंदर्य दृष्टी वाढविण्यासाठी व मुलांच्या कला कौशल्याला चालना देण्यासाठी असे उपक्रम राबविले पाहिजेत. असे प्रतिपादन चंदगड नगरपंचायतीचे नगरसेवक अभिजीत गुरबे यांनी केले.
ते चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पुष्प गुच्छ प्रदर्शन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. पी. पाटील होते. यावेळी नगरसेवक अभिजीत गुरबे यांच्या हस्ते करण्यात आले. नैसर्गिक पाने, फुले, गवताचे पाते, बांबू कागद इ. पासून विद्यार्थ्यांनी आकर्षक पुष्पगुच्छ बनविले.आज बाजारात याच पुष्प गुच्छाची किंमत दोनशे ते तीनशे रुपये आहे. या स्पर्धेत एकूण ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये मोठ्या गटात अनुक्रमे श्रावणी शिंदे, तन्मय जुवेकर, सानिका फाटक, धीरज पाथरवट, आर्या निळकंठ तर लहान गटात सौरभ धुपदाळे,अयान नेसरीकर, वसुंधरा दळवी, इलियास मदार, अनुजा मांगले यांनी यश मिळविले.
परिक्षक म्हणून व्ही. के. गावडे, विद्या डोंगरे, वर्षा पाटील यांनी काम पाहिले. कार्यक्रमाला एन. डी. देवळे, टी. एस. चांदेकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख एम. व्ही. कानूरकर, जे. जी. पाटील, स्पर्धा प्रमुख टी. टी. बेरडे, डी. जी. पाटील, बी. आर. चिगरे, एस. जे. शिंदे, शरद हदगल, पुष्पा सुतार उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन संजय साबळे, टी. व्ही. खंदाळे, सूरज तुपारे, रवि कांबळे यांनी केले.
No comments:
Post a Comment