चंदगड पंचायत समिती |
संपत पाटील / चंदगड - सी. एल. वृत्तसेवा
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंचायत समिती चंदगड यांच्या वतीने ८ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत व्याख्याने, शिबीरे, स्पर्धा, स्वच्छता कार्यक्रम, वृक्षारोपन, ऐतिहासक शस्त्र प्रदर्शने व मर्दानगी खेळ, बचत गट मेळावा व वस्तुंचे प्रदर्शन, गंधर्वगड, पारगड व महिपाळगड येथे स्वच्छता अभियान, सुशोभीकरण, विद्युत रोशनाई यासारख्या विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहीती गटविकास अधिकारी चंद्रकांत बोंडरे यांनी सी. एल. न्युजच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
चंद्रकांत बोंडरे |
दिनांकनिहाय कार्यक्रमांचे आयोजन पुढीलप्रमाणे.........
८ ऑगस्ट २०२२ रोजी आर्थिक व साक्षरता विषयक मार्गदर्शन शिबीर आयोजित केले असून सचिन पाटील यांचे सकाळी १० ते दुपारी १२ झाले. शिक्षण विभाग, पंचायत समिती चंदगड यांचेमार्फत केंद्रियस्तरावर विविध स्पर्धेचे आय़ोजन केले गेले.
९ ऑगस्ट २०२२ रोजी शासकीय कार्यालय आवारात स्वच्छता कार्यक्रम सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत घेतला जाणार आहे. दुपारी १२ ते २ या वेळेत इतिहासकार डॉ. सदानंद गावडे यांचे व्याख्यान सदाशीवराव मंडलीक सभागृह चंदगड येथे होईल.
१० ऑगस्ट २०२२ रोजी शासकीय कार्यालय आवारात वृक्षारोपन कार्यक्रम सकाळी १० ते दुपारी १२. | दुपारी १२ ते २ वेळेत शिक्षक संजय साबळे यांचे व्याख्यान सदाशीवराव मंडलीक सभागृह चंदगड येथे होईल.
१२ ऑगस्ट २०२२ रोजी पंचायत समिती कार्यालयामध्ये महिलांसाठी बचत गट मेळावा व वस्तुंचे प्रदर्शन सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत सदाशीवराव मंडलीक सभागृह चंदगड येथे होईल. तर दुपारी १२ ते दुपारी २ या वेळेत श्रीम. अमनगी यांचे व्याख्यान सदाशीवराव मंडलीक सभागृह चंदगड येथे होईल.
१३ ऑगस्ट २०२२ रोजी अनिल पाटील यांचे पर्यावरण संवर्धन या विषयावर सदाशीवराव मंडलीक सभागृह चंदगड येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत व्याख्यान होईल. त्याचबरोबर शाळा / महाविद्यालयातील मधील विद्यार्थी / NCC यांचे कडुन तालुक्यातील गंधर्वगड, पारगड व महिपाळगड येथे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
१४ ऑगस्ट २०२२ रोजी ऐतिहासिक वारसा जपनारे तालुक्यातील गड गंधर्वगड, पारगड व महिपाळगड यांचे सुशोभीकरण व त्यावर विद्युत रोणनाई केली जाणार आहे.
१५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ७ वाजता ध्वजारोहनाच कार्यकम होईल. तसचे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण समारंभ तहसिल कार्यालय चंदगड येथे होईल.
१६ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत सदाशीवराव मंडलीक सभागृह चंदगड येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
१७ ऑगस्ट २०२२ रोजी पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये सकाळी दहा ते बारा या वेळेत माजी सैनिक / स्वातंत्र्य सैनिक यांचा सत्कार समारंभ समारंभ होणार आहे.
वरील सर्व कार्यक्रमांना नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी व गट विकास अधिकारी वर्ग-१ यांच्या वतीने कऱण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment