चंदगड/प्रतिनिधी
कोल्हापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी महिला मंडळाचा २२ वर्धापनदिन चंदगड तालुक्यातील दुर्गम अशा बांद्राई धनगर वाड्यावर साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर च्या माजी महापौर सुलोचना नाईकवडे होत्या. प्रारंभी दिप प्रज्वलन मंडळाच्या अध्यक्षा सौ. आशा माने, उपाध्यक्ष शकुंतला गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना मंडळाच्या सचिव प्रा.शशिकला सरगर म्हणाल्या कि अहिल्यादेवी महिला मंडळ हे गेली २२वर्षे सामाजिक कार्यात कार्यरत असून या मंडळाच्या वतीने महिला व किशोरवयीन मुलींच्या साठी आरोग्य शबिर तसेच मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त मुलींना गणवेश वाटप करण्यात येतात.यंदाचा २२ वा वर्धापनदिन आज चंदगड तालुक्यातील बांद्राई धनगर वाड्यावर साजरा करून अहिल्यादेवी महिला मंडळाने आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.महिलांना काही अडचण निर्माण झाल्यास आमच्याशी संपर्क साधावा,आम्ही महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करु.
यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे म्हणाले की कोल्हापूर जिल्ह्यातील धनगर वाड्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली तरी अजूनही मुलभूत सोईसुविधा या धनगर वांड्यावर पोहचलेल्या नाहीत. शासनाच्या चराई बंदी, कुऱ्हाड,कोयता बंदी, जंगलात प्रवेश बंदी यासारख्या जाचक कायद्यामुळे यांची संपूर्ण जीवन साखळीच धोक्यात आली आहे.यांची जगण्यासाठी धडपड सुरू आहे आजही या धनगर वाड्यावर दोन तीन दिवस चुली पेटत नाही.यांना जगणं मुश्किल झाले आहे. मग आपल्या मुलांना लागणारे शैक्षणिक साहित्य आणण्यासाठी पैसे कुठून आणणार.. त्यामुळे धनगर वाड्यावरील मुलगा आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागते. ते लागु नये म्हणूनच एक वही समाज बांधवांसाठी दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या समाज बांधवांच्या मुलांसाठी हा सामाजिक उपक्रम लोकसहभागातून सुरू केला आहे. याच उपक्रमांसाठी सामाजिक संस्था दानशूर व्यक्ती, मंडळ, यांच्याद्वारे शैक्षणिक साहित्य घेऊन ते मुलांना देण्यात येते. याच उद्देश ठेऊन आम्ही सौ. आशा माने अध्यक्ष अहिल्यादेवी महिला मंडळ कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधून त्यांना विनंती केली.
कार्यक्रमाला अध्यक्षा सौ आशा रतन माने, सौ अरुणा गावडे, सौ अश्विनी बाबासाहेब वाघमोडे,सौ संगीता जुगळे,सौ संध्या नागण्णावर,सौ नीलिमा हजारे,प्रा सौ नागरत्ना ग्याल,श्रीमती माधवी राजगे,सौ सुनिता सलगर,सौ लता शेळके,श्रीमती सिंधू घागरे,सौ शिवानी सलगर,श्रीमती शकुंतला गावडे, श्रीमती शोभा हजारे,श्रीमती सुलोचना बंडोपंत नायकवडे (माजी उपमहापौर),शैलजा सौ. सुवर्णा लवटे,यावेळी पत्रकार राहुल पाटील,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,विठ्ठल डोईफोडे, आप्पाजी डोईफोडे, पिंटू डोईफोडे, रामु लांबोर विठ्ठल लांबोर, रामु डोईफोडे, नागोबा लांबोर, जनाबाई लांबोर आदी उपस्थित होते. धनगर वाड्यावरील ४४ मुलांना दप्तर, रेनकोट,छत्री,स्वेटर,ट्रकसुट व वह्या, कंपास, रंग पेटी आदी वर्षभर पुरेल इतके शैक्षणिक साहित्य देण्यात आले.प्रास्ताविक सचिन पाटुकले यांनी केले तर आभार मुख्याध्यापक सुभाष गवस यांनी मानले.कार्यक्रमाचे नियोजन अंगणवाडी सेविका व यशवंत क्रांती संघटनेच्या चंदगड तालुका अध्यक्षा सविता डोईफोडे यांनी केले.
No comments:
Post a Comment