चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
तुडये (ता. चंदगड) येथील गणपती रामू पाटील यांच्या मालकीच्या दोन मुरा जातीच्या म्हशींची चोरी शनिवारी रात्री झाल्याची तक्रार चंदगड पोलिसात रतन गणपती पाटील यांनी दिली आहे.
शनिवारी दिवसभर म्हैशी चारून झाल्यानंतर सायंकाळी गोट्यात बांधून दूध काढण्यात आले. यानंतर म्हैशींना वैरण घालून गोट्याला कुलूप लावून गणपती पाटील हे घरी परतले. रविवारी पहाटे दूध काढण्यासाठी गोठ्याकडे गेले असता गोठ्याचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला. परंतु कुलूप न तुटल्याने कडीकोयडा उचकटून गोठ्या बांधण्यात आलेल्या दोन मुरा जातीच्या म्हैशींची दावण तोडून चोरट्यांनी म्हैशींची चोरी केली.
आजूबाजूला तसेच परिसरातील गावातून शोधाशोध केली असता म्हैशींचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. यामध्ये सुमारे लाख रूपयांचे नुकसान शेतकऱ्याचे झाले आहे. तपास पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल राजू जाधव करीत आहेत. तुडये परिसरातील जनावरे चोरीची पहिलीच घटना असल्यामुळे शेतकऱ्यांतून भितीचे वातावरण पसरले आहे.
No comments:
Post a Comment