लाकूरवाडी-महागावजवळ ट्रकने कारला ठोकर दिल्याने कारचे मोठे नुकसान, सुदैवाने कारचालक वाचला - चंदगड लाईव्ह न्युज

06 August 2022

लाकूरवाडी-महागावजवळ ट्रकने कारला ठोकर दिल्याने कारचे मोठे नुकसान, सुदैवाने कारचालक वाचला

अपघातग्रस्त कार

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       वारंवार होणाऱ्या अघातांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लाकूरवाडी घाटात महागाव (ता. गडहिंग्लज) नजीकच्या मोठ्या वळणावर ट्रक नं (MH09CV2786 ) याने नेक्सॉन कार नं. (MH09 FV4883) ला समोरून धडक दिल्याने कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने समोरील एअर बॅग खुलल्याने कारचालक उदय कोकितकर (नरेवाडी, ता. गडहिंग्लज) या अपघातातून बचावले. या अपघातात सदर ट्रकही रस्त्याकडेला जाऊन अपघातग्रस्थ झाला. 

        अधिक माहिती अशी उदय हे आपली कार घेऊन कूदनुरला चालले होते. महागावपासून पुढे असणाऱ्या मोठ्या वळणावर समोरून येणाऱ्या ट्रकचालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने  चूकीच्या दिशेला जाऊन कारला जोराची धडक देऊन रस्त्याकडेला गेला. यामध्ये कारचे प्रचंड नुकसान झाले.

आज या मार्गावर तीन अपघात

सकाळी १o.३० वाजता हुनगिनहाळला बसचा अपघात झाला. यानंतर महागावजवळ दूचाकीचा अपघात झाला. तर दुपारी चार वाजता ट्रक - कार अपघात झाला. या अपघातांची चर्चा सर्वत्र चालू होती.



No comments:

Post a Comment