स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त कोवाड महाविद्यालयाची 'हर घर तिरंगा' जनजागृती रॅली - चंदगड लाईव्ह न्युज

06 August 2022

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त कोवाड महाविद्यालयाची 'हर घर तिरंगा' जनजागृती रॅली

दुर्गा माता मंदिर  कोवाड येथे घर घर तिरंगा जनजागृती फेरीची सुरुवात करताना कोवाड महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

    कोवाड (ता. चंदगड) येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील एनएसएस विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त 'हर घर तिरंगा' जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले.

          माजी विद्यार्थी व तरुण उद्योजक नरसिंग पाटील यांच्या हस्ते दुर्गामाता चौकात फेरीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. दीपक पाटील यांनी स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकारक नेते यांच्या कार्याचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असे मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त महाविद्यालयामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून यात हर घर झेंडा प्रभात फेरी बरोबरच देशभक्तीपर गीत गायन, शहीद जवानांच्या कुटुंबांचा सन्मान, किल्ले महिपालगड स्वच्छता  मोहीम, मॅरेथॉन स्पर्धा, समुपदेशन शिबिरे आदींचा समावेश असल्याची माहिती दिली. 

         जनजागृती फेरी कामी सर्वोदय शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. ए. एस. जांभळे, उपाध्यक्ष बी. आर. पाटील, सचिव एम. व्ही. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. रॅली उद्घाटन प्रसंगी संचालक जोतिबा चुडापा वांद्रे, तलाठी राजश्री पचंडी, संतोष आढाव, विक्रम पेडणेकर, प्रा. आर. टी. पाटील,  बी. एस. पाटील, शीतल मंडले, प्रियांका कांबळे, लक्ष्मण बागीलगेकर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. व्ही. के. दळवी यांनी केले. आभार प्रा. के. एस. काळे यांनी मानले. एनएसएस विभागातील स्वयंसेवक फेरीत सहभागी झाले होते. जनजागृतीपर फलकांसह कोवाड गावातील सर्व गल्लीतून फेरी झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्या नजीक सांगता करण्यात आली. यावेळी सरपंच अनिता भोगण, उपसरपंच पुंडलिक जाधव, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, व्यापारी मंडळ ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. 

No comments:

Post a Comment