कागणी - कालकुंद्री रस्त्यावर विजेच्या तारेवर झाडाची फांदी - चंदगड लाईव्ह न्युज

04 October 2022

कागणी - कालकुंद्री रस्त्यावर विजेच्या तारेवर झाडाची फांदी

 

कागणी : कालकुंद्री रस्त्याला लागून डीपी जवळ तारेवर पडलेली झाडाची फांदी.

कागणी : सी. एल. वृत्तसेवा 

        कागणी ते कालकुंद्री यादरम्यानच्या रस्त्यावर असलेल्या डीपीजवळ तारेवर झाडाची फांदी कोसळली आहे. या ठिकाणाहून तांबाळ नावाच्या शेतात शेकडो शेतकरी ये जा करत आहेत. गत आठ दिवसापासून सदर फांदी जैसे थे असून संबंधित वीज कर्मचाऱ्यांनी सदर फांदी हटवून संभाव्य धोका टाळावा, अशी मागणी शेतकरी व प्रवाशातून होत आहे. No comments:

Post a Comment