तेऊरवाडी येथे मोफत आरोग्य शिबिर - चंदगड लाईव्ह न्युज

04 October 2022

तेऊरवाडी येथे मोफत आरोग्य शिबिर

 

आरोग्य शिबिरामध्ये मार्गदर्शन करताना माजी जि. प. सदस्य कल्लाप्पा भोगण, शेजारी अशोक पाटील

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
निदान क्लिनिक कोवाड, तेऊरवाडी ग्रामपंचायत व विविध मंडळे यांच्याकडून तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. मुंबई सुरक्षा रक्षक कामगार युनियनचे संस्थापक सरचिटणीस अशोक पाटील यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. सुगंधा कुंभार होत्या.
यावेळी प्रमख पाहूणे म्हणून जि. प. सदस्य कल्लाप्पा भोगण, प्रा. गुरवाना पाटील उपस्थित होते.
    या शिबिराचा लाभ तेऊरवाडीतील ग्रामस्थानी घेतला. शिबिरामध्ये  डॉ. सौ. अस्मिता पाटणे, डॉ. सौ. सुप्रिया रुद्रापगोळ, डॉ योगेश बिर्जे, डॉ. विनोद व्हन्याळकर, डॉ. सुधाकर  पाटील, विक्रम पवार आदि डॉक्टरानी रूग्ण तपासणी केली. या कार्यक्रमाला उपसरपंच सौ. शालन पाटील याच्यासह सर्व ग्राम पंचायत सदस्य, नवीन वसाहत क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, कलाप्रेमी सांस्कृतिक मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.




No comments:

Post a Comment