अडकूर येथे विद्यार्थ्यांनी शाळेत केले शस्त्र पूजन, संस्कृती जपण्याचा प्रयत्न - चंदगड लाईव्ह न्युज

04 October 2022

अडकूर येथे विद्यार्थ्यांनी शाळेत केले शस्त्र पूजन, संस्कृती जपण्याचा प्रयत्न

शस्त्र पूजन केलेल्या शस्त्रासोबत विद्यार्थी व विद्यार्थिनी

अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

        भारतीय संस्कृती संपूर्ण जगात सर्वश्रेष्ठ आहे. या देशात  सन आणि उत्सवाना कमतरता नाही. सध्या चालू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूर (ता. चंदगड) च्या विद्यार्थ्यानी चक्क शालेय क्रीडांगणावर विविध शैक्षणिक साहित्याचे शस्त्र पूजन करून भारतिय संस्कृतीची जोपासना केली.

     शस्त्रपूजन (खंडेनवमी) च्या निमित्ताने शाळेमध्ये क्रीडा शिक्षक आय. वाय.गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यानी हॉलीबॉल नेट, व्हाली बॉल, रिंग, थाळी, गोळा, वही, पेन, पुस्तक आदि शस्त्रांचे पूजन करण्यात आले. शिक्षक व विद्यार्थ्यासाठी हिच सर्व साधने शस्त्र आहेत. याचा योग्य आणि पुरेपूर उपयोग करण्याचे आवाहन यावेळी बोलताना पी. के. पाटील यांनी केले. प्राचार्य व्ही. एन. सुर्यवंशी यानी भारतीय संस्कृतीत शस्त्र पूजनाचे महत्व स्पष्ट केले. या कार्यक्रमाला एस. एन पाटील, एस. एन. पाडले, एस. डी. पाटील, बंकट हिशेबकर यांच्यासह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment