'ताम्रकाठ' दिवाळी अंकाचे कुदनूर येथे प्रकाशन - चंदगड लाईव्ह न्युज

25 October 2022

'ताम्रकाठ' दिवाळी अंकाचे कुदनूर येथे प्रकाशन

कुदनूर येथे ताम्रकाठ दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना मान्यवर.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

        'ताम्रकाठ' दिवाळी अंकाचे प्रकाशन नुकतेच कुदनुर (ता. चंदगड) येथे मान्यवरांच्या हस्ते पार पडले. ताम्रकाठ दिवाळी अंकाचे यंदा चौथे वर्ष असून दर्जेदार वाचनीय कथा, कविता, लेख यामुळे दिवाळी अंक वाचकांच्या पसंतीस उतरला आहे.

     सिद्धेश्वर मंदिर कुदनूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमाचे स्वागत अंकाचे संपादक चंद्रकांत कोकितकर यांनी केले. यावेळी उपसरपंच नामदेव कोकितकर, सेवा संस्था संचालक तुकाराम मल्हारी, पत्रकार श्रीकांत पाटील, लेखक के जे पाटील, नितीन हदगल, काडेश हिरेमठ- स्वामी, शिवकुमार हिरेमठ- स्वामी, परशुराम चौगुले आदींची उपस्थिती होती. 

No comments:

Post a Comment