कालकुंद्री लक्ष्मी दूध संस्थेकडून सर्वाधिक दूध उत्पादकांना बक्षिसे - चंदगड लाईव्ह न्युज

25 October 2022

कालकुंद्री लक्ष्मी दूध संस्थेकडून सर्वाधिक दूध उत्पादकांना बक्षिसे

लक्ष्मी दूध संस्था कालकुंद्री येथे सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या सभासदांना बक्षिसे वाटप करताना मान्यवर.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

        श्री लक्ष्मी महिला सहकारी दूध संस्था कालकुंद्री (ता. चंदगड) यांच्या वतीने संस्थेला वर्षभरात सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या सभासदांना बक्षिसे व बोनस वाटप करण्यात आला.

      म्हैस दूध उत्पादक गटातील विजेते अनुक्रमे अनुसया रमेश पाटील, सुनिता नारायण पाटील, वंदना विनायक पाटील तर गाय दूध उत्पादक गटात लक्ष्मी कलाप्पा नाईक, रेणुका कल्लाप्पा पाटील, राधिका मनवाडकर यांनी बक्षीस पटकावली. बक्षीस वितरण ग्रामपंचायत सदस्य विलास शेटजी, प्रशांत मुतकेकर, सेवा संस्था संचालक हरिबा लिंबाजीगावडे यांच्या हस्ते झाले यावेळी विनायक पाटील, रमेश पाटील, हनुमंत नाईक, युवराज नाईक, कल्लाप्पा पाटील, लोकळू पाटील, किसन मनवाडकर अनिल तेऊरवाडकर, कल्लाप्पा पांडूगावडे, संस्थेच्या चेअरमन, संचालिका व सभासद यांची उपस्थिती होती. 

        दिवाळीनिमित्त दूध उत्पादक सभासदांना म्हैस दुधाला ८ टक्के तर गाय ७ टक्के प्रमाणे बोनस वाटप करण्यात आला.

No comments:

Post a Comment