नांगनूर येथे आज येणार बाळूमामांच्या भूमिकेतील समर्थ पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

04 October 2022

नांगनूर येथे आज येणार बाळूमामांच्या भूमिकेतील समर्थ पाटील


महागाव : सी. एल. वृत्तसेवा

           नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथील नवदुर्गा तरुण मंडळामार्फत नवरात्र उत्सव काळात दुर्गामातेची प्रतिष्ठापना करुन समाजप्रबोधनचे विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. आज मंगळवार दि. ४ रोजी  सायंकाळी महाप्रसादचे आयोजन केले आहे.  महाप्रसाद प्रारंभ प्रसंगी कलर्स मराठी वाहिनीवरील 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेत  बाळूमामांच्या बालपणीची भूमिका  साकारणारा समर्थ पाटील उपस्थित रहणार आहे. यावेळी महाप्रसाद व नवदुर्गा दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष सुरेश रावण यांनी मंडळाच्या वतीने केले आहे.

No comments:

Post a Comment