हभप भरमू भिंगुडे भरमू शिपूरकर मारूती पाटील हभप सुगंधा पाटील
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
नवरात्र उत्सवाच्या ऐन धामधुमीत सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना तेऊरवाडी (ता. चंदगड) गाव मात्र शोकसागरात बुडाले आहे. कारणही तसेच आहे. कारण एकाच दिवशी एकाच गावातील अचानकपणे चौघांचा मृत्यू झाल्याने संपर्ण गावच सुन्न झाला आहे.
सर्वप्रथम तेऊरवाडी गावचे आध्यात्मिक गुरु भरमू विठोबा भिंगुडे यांचे आकस्मित निधन झाले. त्यांचा अंत्यसंस्कार होण्यापूर्वीच गावातील भरमू सुबराव सिप्पूरकर यांचेही आकस्मित निधन झाल्याची धक्कादायक बातमी समजली. लगेच दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मारूती सटूपा पाटील यांचेही निधन झाले. हे तिन धक्के सहन करतानाच सायंकाळी ६ वाजता चौथा धक्का ग्रामस्थांना बसला. हभप सुगंधा कृष्णा पाटील यांचेही आकस्मित निधन झाल्याची बातमी आली अनं संपूर्ण गावच सुन्न झाला. हभप सुगंधा यांनी तर यापैकी दोघांचे अंत्यदर्शन घेतले होते. चालता - बोलता चौघांचे निधन झाल्याने ग्रामस्थांबरोबर तेऊरवाडी पंचक्रोशी सुन्न झाली आहे. संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.
No comments:
Post a Comment