शिरगांव येथील हाॅटेल चालकाचा खाजगी सावकारीने घेतला बळी - चंदगड लाईव्ह न्युज

18 October 2023

शिरगांव येथील हाॅटेल चालकाचा खाजगी सावकारीने घेतला बळी

सुरेश भोगण

चंदगड / प्रतिनिधी
      व्याजाने दिलेले पैसे परत दिले नाहीत म्हणून लाकडी काठीने डोकीत वार केल्याने शिरगांव येथील एका हाॅटेल चालकाचा मृत्यू झाला. सुरेश भोगण (वय वर्ष ५८, रा. मजरे शिरगांव, ता. चंदगड) असे मयताचे नाव असून माराहाण करणारा संशयीत आरोपी दत्तु धोंडिबा गावडे (रा. नागनवाडी) याला चंदगड पोलिसांनी अटक केली आहे.
        पोलीसातुन मिळालेली माहिती अशी की, चंदगड तालुक्यातील चंदगड फाटा येथे हाॅटेल सेलिब्रेशन नावाचे हॉटेल मजरे शिरगांव येथील सुरेश भोगण चालवत होते. हाॅटेल धंद्यासाठी भोगण यांनी दत्तु गावडे यांचे कडून ४० हजार रूपये व्याजाने घेतले होते. ते पैसे परत करण्यावरून दोघांमध्ये रविवारी शिवीगाळ होवून वाद झाला. या वादातून हाणामारी होवून संशयीत आरोपीने भोगण यांच्या डोक्यात लाकडी टोण्याने वार केला. त्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा काल (मंगळवारी दि. १७ ऑक्टोबर रोजी) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी दत्तू गावडे याला चंदगड पोलीसांनी अटक केली आहे.
      याबाबतची फिर्याद मयताची पत्नी साधना भोगण यांनी चंदगड पोलिसांत दिली आहे. चंदगड पोलिसांनी संशयीत आरोपी दत्तु गावडे याला अटक करून चंदगड न्यायालयात हजर केले असता २ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. मुल्ला करत आहेत.

No comments:

Post a Comment