रवळनाथ'च्या बलुतेदार सन्मान ठेव योजनेचा शुभारंभ - प्रा. व्ही. के. मायदेव : रवळनाथ हौसिंग फायनान्सचा २७ वा वर्धापन दिन उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

19 October 2023

रवळनाथ'च्या बलुतेदार सन्मान ठेव योजनेचा शुभारंभ - प्रा. व्ही. के. मायदेव : रवळनाथ हौसिंग फायनान्सचा २७ वा वर्धापन दिन उत्साहात

श्री रवळनाथ हौसिंग फायनान्सच्या वर्धापन दिनानिमित्त श्री रवळनाथ प्रतिमा पूजन करताना प्राचार्य डॉ. अशोक सादळे व उपप्राचार्य दिलीप संकपाळ व इतर

चंदगड / प्रतिनिधी

          बँकींग क्षेत्रात अनेक नवनवीन योजना राबविल्या जातात परंतु सर्वच योजनांचा सर्वसामान्यांना लाभ घेता येत नाही. त्यामुळे समाजातील सर्व सामान्य घटक असलेल्या बलुतेदारांच्या आर्थिक सन्मानासाठी व त्यांना बचतीची सवय लागावी. या साठी आम्ही संस्थेतर्फे बलुतेदार सन्मान ठेव योजना सुरु करीत आहोत. अशी घोषणा संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. व्ही. के. मायदेव यांनी केली. श्री रवळनाथ को - ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटी व आजरा शाखेच्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त आजरा शाखेत आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. आजरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सादळे व उपप्राचार्य दिलीप संकपाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

        प्रा. मायदेव पुढे म्हणाले एम. एल. चौगुले यांच्या अथक परिश्रमातून या संस्थेचा विस्तार वाढला आहे. या यशस्वी वाटचालीत संस्थापक संचालकांचे योगदानही खूप मोलाचे आहे. प्राचार्य डॉ. अशोक सादळे म्हणाले, आज - यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा - यांनी सर्व सामान्यांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी श्री. चौगुले यांनी काही सहका-यांसोबत घेऊन श्री रवळनाथ को - ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीची स्थापना केली. संस्थेने अवघ्या २७ वर्षात सहकारात घेतलेली भरारी कौतुकास्पद आहे. या संस्थेचा मी सभासद आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. प्रा. दिलीप संकपाळ म्हणाले, सहकार क्षेत्रातील रवळनाथची कामगिरी उत्तम आहेच. त्याच बरोबर संस्थेने सामाजिक बांधिलकीतून अनेक सर्व सामान्य गरजूना वेळोवेळी मदत केली आहे. त्यामुळेच सर्व सामान्यांच्या हितासाठी झटणारी संस्था म्हणून श्री रवळनाथ हौसिंग फायनान्सकडे पाहिले जाते. याप्रसंगीसंस्थेच्या बलुतेदार सन्मान ठेव योजनेतील ठेवीदार जयवंत कुंभार, श्रीधर चव्हाण, स्वप्निल सुतार, सौ. गिता सुतार या ठेवीदारांच्या पावत्यांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तसेच दिवस भरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संस्थेला भेट देवून वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास रवळनाथचे संचालक प्रा. डॉ. किरण पोतदार, संस्थापक संचालक प्रा. डॉ. शिवशंकर उपासे, बसाप्पा आरबोळे, प्रा. किरण प्रधान, प्रा. जनार्दन दळवी, प्रा. वैजनाथ बचुटे, शाखा सल्लागार सौ. नूरजहाँ सोलापूरे, सौ. सुरेखा भालेराव यांच्यासह प्रा. दिलीप भालेराव, सदानंद रोडगी, बसवराज चराटी, रमेश कारेकर, मनोहर गवाणकर, हणमंत पाटील, इंजि. जितेंद्र शेलार, षडानन देशपांडे, प्रमोद कांबळे, स्नेहा क्षिरसागर, शाखाधिकारी बसवराज चौगुले यांच्या सभासद, ठेवीदार, हितचिंतक व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आजरा शाखेचे चेअरमन डॉ. विनायक आजगेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जनसंपर्क अधिकारी बाबासाहेब मार्तंड यांनी सुत्रसंचालन केले. रवळनाथचे सीईओ डी. के. मायदेव यांनी आभार मानले. 

No comments:

Post a Comment