हलकर्णी महाविद्यालयात भित्तिपत्रकांचे उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

19 October 2023

हलकर्णी महाविद्यालयात भित्तिपत्रकांचे उद्घाटन

 


चंदगड / प्रतिनिधी

      हलकर्णी (ता.  चंदगड) यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागामार्फत आयोजित भित्तिपत्रकाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी चांद्रयान मोहिम, सोलर एल वन मोहिम, भौतिकशास्त्रात मिळालेले नोबेल पारितोषिके, विविध तंत्रज्ञान इत्यादी विषयांवरील भित्तिपत्रकांचे सादरीकरण केले.या विभागाचे माजी विद्यार्थी प्रा. नंदकुमार पाटील यांनी विद्याथ्यांना मार्गदर्शन केले." विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्रातील नियम, त्यांचे मानवी जीवनात होणारे उपयोग, करिअरच्या वाटा याविषयीची माहिती घ्यावी, आज तंत्रज्ञानात होणारी प्रगती समजाऊन घ्या." असे मत त्याने व्यक्त केले. 

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैष्णवी पाटील यांनी केले. यावेळी  शिवाजी विद्यापीठ आयोजित विभागीय युवा महोत्सवात यश संपादन केले बद्दल प्रा.प्रदिप बोभाटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजेश घोरपडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.प्रा.श्रीनिवास मोरे, विनायक मुगेरी, बशीर शहा, जोतीबा पाटील उपस्थित. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रदिप पाटील  यांने केले. तर आभार रेणूका पिटूक हिने मानले.


No comments:

Post a Comment