नुकसानग्रस्त दुध उत्पादकाला तातडीची मदत देताना गोकुळ संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर
गडहिंग्लज / सी. एल. वृत्तसेवा
खणदाळ (ता. गडहिंग्लज) येथील दुध उत्पादक नंदकुमार दिवटे यांनी जनावरांना डास चावु नयेत म्हणून केलेला धुर अती प्रमाणात झाला. परिणामी दिवटे यांच्या गोठ्यातील जनावरे, म्हैस, बकरी व कोंबड्या गुदमरून मृत्युमुखी पडली. त्यामुळे त्यांचे लाखोंचे नुकसान झाले.
दिवटे यांच्या जनावारांची जिवीतहानी झालीची बातमी कळताच कार्यतत्पर गोकुळ संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ रोख रक्कम १०,००० रूपयांची मदत केली. तसेच शासन स्तरावरून मदत मिळवुन देण्याचे आश्वासन दिले. यावेळी गोकुळ दुधसंघाचे अधिकारी प्रकाश पाटील, डॉ. जोशी, किरण पाटील, युवराज राऊत व दुध उत्पादक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment