कालकुंद्री येथे २२ ऑक्टोबर रोजी पुरुष व महिलांसाठी विविध पाच गटात मॅरेथॉन स्पर्धा - चंदगड लाईव्ह न्युज

20 October 2023

कालकुंद्री येथे २२ ऑक्टोबर रोजी पुरुष व महिलांसाठी विविध पाच गटात मॅरेथॉन स्पर्धा

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 

        कालकुंद्री (ता. चंदगड) येथील श्री कल्मेश्वर स्पोर्ट क्लब यांच्यावतीने २२ ऑक्टो. २०२३ रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सकाळी ७.०० वाजता सुरुवात होणाऱ्या स्पर्धा पुरुष व महिलांसाठी विविध पाच गटात सोडण्यात येणार आहेत. 

        या स्पर्धेत १४ वर्षे वयोगट मुले अंतर २ किमी बक्षीसे अनुक्रमे रोख रु. १५००,१०००,७००,५००,३००. १७ वर्षाखालील मुले अंतर ४ किमी बक्षीसे अनुक्रमे रोख रु .३ हजार, २ हजार, १५००, १०००, ५००. १७ वर्षाखालील मुली अंतर ३ किमी बक्षीसे अनुक्रमे रोख रु. १५००, १०००, ७००, ५००, ३००. खुला गट मुले अंतर ६ किमी बक्षीसे अनुक्रमे रोख रु.- ५ हजार, ४ हजार, ३ हजार, २ हजार, ५००/-. खुला गट मुली अंतर ४ किमी. बक्षीसे अनुक्रमे रोख रुपये २०००, १५००, १०००, ७००, ५००/- अशी असून सर्व विजेत्यांना पदक व ट्रॉफी देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी येताना ओरिजनल आधार कार्ड आणणे बंधनकारक आहे. धावपटूंनी शेकडोंच्या संख्येने सहभागी व्हावे, नाव नोंदणीसाठी- 7028859363, 9371789391, 8983767027, 9021742494 यापैकी मोबाईलवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment