हलकर्णी महाविद्यालयाची सोनाली गडकरी विद्यापीठात वनस्पतीशास्त्र विषयात प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

18 October 2023

हलकर्णी महाविद्यालयाची सोनाली गडकरी विद्यापीठात वनस्पतीशास्त्र विषयात प्रथम

सोनाली गडकरी
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

           हलकर्णी  (ता. चंदगड) येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातील बी. एस्सी. भाग तीनची विद्यार्थिनी सोनाली गोपाळ गडकरी हिने नुकत्याच झालेल्या एप्रिल २०२३ मध्थे बी. एस्सी भाग तीनच्या परीक्षेत संपूर्ण विज्ञान शाखेत विद्यापीठातून चौथा येण्याचा तर वनस्पतीशास्त्र विषयात शिवाजी विद्यापीठात प्रथम येण्याचा मान मिळवला. तिने शिवाजी विद्यापीठात मिळविलेल्या या घवघवीत यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे. 

       सोनालीने बी. एस्सी भाग तीन या परीक्षेत एकूण ९६ टक्के गुण प्राप्त केले आहेत. कु. सोनालीला वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. ए व्ही पाटील, रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा ए एस बागवान, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर ए घोरपडे, प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. एन सी हिरगोंड, संख्याशास्त्र विभागप्रमुख डॉ. ए व्ही दोरुगडे, प्रा. व्ही. व्ही. कोलकार व सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन तिला लाभले.तर दौलत विश्वस्त संस्थेचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर सर्व प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांनी तिचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment