कोल्हापूर जिल्हा महसूल कर्मचारी संघटना अध्यक्षपदी राहुल शिंदे तर उपाध्यक्षपदी राणी शिरसाठ यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

18 October 2023

कोल्हापूर जिल्हा महसूल कर्मचारी संघटना अध्यक्षपदी राहुल शिंदे तर उपाध्यक्षपदी राणी शिरसाठ यांची निवड

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          कोल्हापूर जिल्हा क वर्ग महसूल कर्मचारी संघटनेच्या निवडणूकीत राहुल अशोकराव शिंदे यांची व उपाध्यक्षपदी श्रीमती राणी शिरसाठ यांची तर कोषाध्यक्ष पदावर गुरूप्रसाद जाधव यांची बहुमताने निवड करण्यात आली.संघटना स्थापनेनंतर प्रथमच निवडणूक घेण्यात आली. या संघटनेत प्रथमच परिवर्तन झाले.

     महसूल कर्मचारी संघटना गट क वर्ग यांनी आपले बहुमोल असे मतदानाचे कर्तव्य पार पाडलेले आहे शासकीय कामांमध्ये ज्याप्रमाणे मन लावून सर्व जिल्हा प्रशासनाचे महसूल कर्मचारी फिरणे भाग घेऊन काम करतात मग ते कोणतेही निवडणूक कामकाज असू दे नैसर्गिक आपत्ती कामकाज असू दे अथवा कोणतेही त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्हा महसूल कमी संघटना हेही सर्व महसूल कर्मचारी यांच्या जिव्हाळ्याची संघटना आहे. गेले दहा वर्ष सुनील देसाई मेजर हे कोल्हापूर जिल्हा महसूल कर्मचारी संघटना अध्यक्षपदी होते तथापि आज कोल्हापूर जिल्ह्यातील क वर्ग महसूल कर्मचारी यांनी आज चुरशीने ८२ टक्के मतदान करून एकूण ३६६ मतदारांपैकी ३०२ मतदारांनी आपले मतदानाचा हक्क बजावला तसेच यामध्ये १५१ मते मिळवून राहुल शिंदे हे विजयी झाले. 

        सदर निवडीमध्ये सर्व पुरुष व महिला महसूल कर्मचारी यांनी उस्फुर्त प्रतिसाद देवून मतदान केले. या निवडणुकीत लखन खाडे कार्याध्यक्षपदी, अमित पाटील सरचिटणीस पदी तेजपाल हे सहकोषध्यक्षपदी,तसेच सुजाता काजिरणेकर यांची महिला प्रतिनिधी पदी बिनविरोध निवड झाली.  निवडणुकीचे सर्व कामकाज मंडळाधिकारी प्रविण माने यांनी अतिशय नियोजनबद्धरीत्या पार पाडले. यावेळी  विनायक लुगडे, अंकुश रानमाळे, सतीश ढेंगे, गणेश बर्गे, प्रशांत कोरवी, सर्वश्री तेजपाल, सागर त्रिगुने, नवनाथ डवरी, सुनील दळवी, संदीप पाटील, उत्तम खापरे पाटील, राहुल पाटील, मनोहर महाडिक, पुंडलिक नागरगोजे, आदित्य कांबळे, अजय लुगडे, सचिन सवळेकरी, आणेकर, आणि विद्या शिंदे, मनिषा नाईक, जयश्री गजगेश्वर, अर्चना गुळवणी व इतर सर्व महसूल कर्मचारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment