म्हाळेवाडी येथील प्रा. गोविंद अंबी यांना पीएचडी पदवी प्रदान - चंदगड लाईव्ह न्युज

01 January 2024

म्हाळेवाडी येथील प्रा. गोविंद अंबी यांना पीएचडी पदवी प्रदान

प्रा. गोविंद अंबी

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

     म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथील सुपुत्र व कापशी (ता. शाहूवाडी) येथील श्री संत गाडगेबाबा महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रा. गोविंद मारुती अंबी यांनी शिवाजी विद्यापीठाकडून समाजशास्त्र विषयातील पीएचडी पदवी प्राप्त केली. "ऑक्युपेशनल मोबिलिटी अमंग द बेरड कम्युनिटी : ए केस स्टडी ऑफ चंदगड तालुका  या विषयावर त्यांनी शिवाजी विद्यापीठाला प्रबंध सादर केला होता. 

          त्यांनी चंदगड तालुक्यातील बेरड (रामोशी) समाजाच्या व्यावसायिक गतिशीलतेवर सूक्ष्म अभ्यास करून आपल्या संशोधनातून विविध निष्कर्ष काढून शिफारशी केल्या आहेत. त्यांनी पदव्युत्तरचे शिक्षण शिवाजी विद्यापीठातील डॉ. आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवनच्या "कमवा आणि शिका" या योजनेतून पूर्ण केले आहे. सध्या ते श्री स्वामी विवेकानंद संस्थेच्या श्री संत गाडगेबाबा महाविद्यालय कापशी, (ता. शाहुवाडी) या शाखेत सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. 

        त्यांना मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. जगन कराडे यांचे मार्गदर्शन लाभले. विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रतिमा पवार, प्रा. डॉ. प्रल्हाद माने, प्रा. डॉ. प्रतिभा देसाई, स्वामी विवेकानंद संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे तसेच सचिव शुभांगी गावडे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. जे. डी. नदाफ तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक  यांचे सहकार्य लाभले.


No comments:

Post a Comment