चंदगड तालुक्यातील रामपूर येथील अख्खा शिवार आगीच्या भक्षस्थानी, सुमारे 20 एकर पेक्षा जास्त क्षेत्रातील ऊस जळून खाक, तातडीने पंचनामे सुरू कारखाण्यानी ऊस उचलण्याची शेतकऱ्यांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

01 January 2024

चंदगड तालुक्यातील रामपूर येथील अख्खा शिवार आगीच्या भक्षस्थानी, सुमारे 20 एकर पेक्षा जास्त क्षेत्रातील ऊस जळून खाक, तातडीने पंचनामे सुरू कारखाण्यानी ऊस उचलण्याची शेतकऱ्यांची मागणी

आगीत जळून खाक झालेला ऊस.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड तालुक्यातील रामपूर येथील नदीकाठील शिवाराला अचानक सकाळी 11 वाजता आग लागल्याने अख्खा शिवार आगीच्या भक्षस्थानी पडला. यामध्ये सुमारे 20 एकर क्षेत्रापेक्षा अधिक ऊस जळून खाक झाला. गावातील एकाही शेतकऱ्यांच्या ऊस बचावला नसल्याने हळहळ व्यक्त होत आहे. ही आग कशाने लागली याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.  

      चंदगड तालुक्यातील रामपूर येथील नदीकाठच्या शिवारात असणाऱ्या 20 एकर क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला. रामपूर गावातील नदीकाठी असणाऱ्या एकाही शेतकऱ्यांचा ऊस या आगीच्या बक्षीसस्थानातून वाचला नाही. दुपारी अकरा वाजता लागलेल्या आगीने उन्हात तडाका घेतल्याने शेतकऱ्यांनी प्रयत्न करूनही ऊस वाचू शकला नाही. 

       अख्खा गाव भर दुपारी आग विजवण्यासाठी आपापल्या उसाच्या फडात कार्यरत असताना सुद्धा आगीच्या रौद्र रूपाफुढे शेतकरी हातभल झाला. अख्ख्या शिवारालाच आग लागल्याने शेतकऱ्यांचा आक्रोश आणि महिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. आग नेमकी कशाने लागली हे कारण अद्याप स्पष्ट झाली नसले तरी या आगीमुळे प्रत्येक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने सदर जळीत उसाचे पंचनामे तातडीने करून या उसाची तोड कार्यक्षेत्रातील ऊस कारखान्यांनी करावी अशी मागणी ऊस जळीतग्रस्त शेतकऱ्यांतून होत आहे.

No comments:

Post a Comment