सरपंच परिषदेच्या वतीने नुतन लोकनियुक्त सरपंचांचा चंदगड येथे सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

01 January 2024

सरपंच परिषदेच्या वतीने नुतन लोकनियुक्त सरपंचांचा चंदगड येथे सत्कार

 

चंदगड येथे सत्कार कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले सरपंच. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र) यांचे वतीने चंदगड येथिल  नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंचांचा सत्काराचा कार्यक्रम पंचायत समिती सभागृह चंदगडमध्ये संपन्न झाला. चंदगड तालुकाध्यक्ष   आर. जी. पाटील यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या राज्याचे सरचिटणीस राजू पोतणीस व जिल्हा समन्वयक इंजि. जी. एम. पाटील यांचे हस्ते, शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंचाचा सत्कार करणेत आला. 

‌      यावेळी उत्साळी गावच्या माजी सरपंच सौ. माधुरी सावंत / भोसले  यांनी सरपंचांचे  हक्क/अधिकार  व कार्यपद्धतीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व विविध योजनांसाठी शासनस्तरावरून येणा-या निधीचा विनोयोग कशा प्रकारे शासन चौकटीमध्ये बसवला पाहिजे हे विषद  केले.

‌          म्हाळेवाडी गावचे सरपंच, व सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र) चे चंदगड तालुका उपाध्यक्ष. सी. ए. पाटील यांनी संघटीत झाल्याने सरपंचांना आत्मनिर्भरता प्राप्त होते. त्यासाठी सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र) च्या माध्यमातून आपण संघटीतपणे गावागावात विकासकामांचे जाळे विणुयात  असे अवाहन केले.

‌          आपल्या मनोगतामध्ये राज्य सरचिटणीस राजू पोतणीस  म्हणाले, ``सर्व सरपंचांनी गावगाड्यांच्या हितासाठी झोकून देऊन काम कण्याची गरज आहे त्यासाठीच आपण गावचे सरपंच' आहोत. कोणत्या गटाचे अथवा पक्षाचे आहोत या  गोष्टी विसरण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

       सलग पाच वर्षे नियोजनबद्ध कारभार करता यावा. यासाठीचं 'लोकनियुक्त सरपंच' ही प्रमुख मागणी शासनाकडून मंजूर करवून आणण्यामध्ये सरपंच परिषद मुंब‌ई (महाराष्ट्र) ने यश मिळविले आहे. आपण सर्व सरपंचांनी मिळालेल्या संधीचे सोने करावं असे आवाहन केले.

             समाजसुधारक आण्णा हजारे आणि हिवरे  बाझारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांचे मार्गदर्शनाखाली चाललेल्या सरपंच परिषद मुंब‌ई (महाराष्ट्र)ची ठळक वैशिष्ट्ये सांगताना जिल्हा समन्वयक इंजि. जी. एम. पाटील म्हणाले पक्षविरहीत, पारदर्शी व समाजाभिमुख काम करणाऱ्या या संघटनेचे, सक्षम ग्रामपंचायत व सन्माणित सरपंच  हे पमुख उद्‌दीष्ठ आहे          गावानं आपल्याला सरपंच पदाची जबाबदारी दिलेली आहे. गावच्या विकासाच्या कारभारा बाबत जेव्हा सरपंच पदाच्या इतिहासाची चर्चा होईलतेव्हा आपल्याला मिळालेल्या कालखंडाची 'उत्कृष्ठ कारभार' अशी नोंद व्हावी. असे आपण काम करून दाखवूयात.

    यावेळी सुंडीचे सरपंच मनोहर कांबळे यांची जिल्हा समन्वयक व उत्साळीच्या माजी सरपंच सौ. माधुरी सावंत /भोसले यांची महिला जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली

       यावेळी धुमडेवाडीचे  सरपंच  आर. जी. पाटील, डी. जी नाईक माजी सरपंच आसगांव त्याचबरोबर ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष श्री. मोटुरे  यांनीही आपले मनोगत व्यक केली.

      या कार्यक्रमाचे नेटके नियोजन व सुत्रसंचलन तालुका कार्याध्यक्ष पी. डी. पाटील यांनी केले. यावेळी परिषदेचे सचिव तानाजी पवार, नांद‌वडेचे सरपंच राजेंद्र कांबळे, कार्वेचे सरपंच श्री. आपके, हल्लरवाडीचे सरपंच सुभाष गावडे, सुरुते सरपंच मारुती पाटील, तिऊरवाडीचे सरपंच मनिषा पाटील, नागवेच्या सरपंच मनिषा पाटील याचबरोबर तालुक्यातील सर्व सरपंच  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment