चंदगड / प्रतिनिधी
शिरोली (ता. चंदगड) येथील रहिवासी व नोकरी निमित्त मुंबईत वास्तव्यास असणारे भगवान राघव यांची रोटरी क्लब ऑफ डोंबिवली रेजेन्सी अनंतम या संस्थेच्या अध्यक्षपदी रोटेरियन भगवान आप्पाजी राघव यांची निवड करण्यात आली.
डिस्ट्रिक्ट ३१४२ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन दिनेश मेहता, असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन विकास संकुलकर व डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रोटेरियन प्रशांत आंबेकर उपस्तित होते माजी अध्यक्ष रोटेरियन अमोल लांडे यांनी २०२४-२०२५ या वर्षाकरिता अध्यक्ष पदाची सूत्रे श्री राघव यांच्या कडे सोपवली. नवीन वर्षा करिता क्लब चे नवीन सेक्रेटरी रॉटेरियन योगेश तिवारी , खजिनदार रॉटेरियन सोवेन बॅनर्जी यांनी सूत्रे स्वीकारली.क्लब चे मेंटर विकी नागदेव यांनी या क्लब साठी मोलाची कामगिरी बजावली आहे भगवान राघव हे स्वतःचा व्यवसाय सांभाळून नेहमी सामाजिक कामासाठी वेळ देत आहे. रोटरी क्लब ऑफ रेजेन्सी अनंतम ही संस्था जागतिक स्तरावर कार्य करणारी संस्था आहे.या रोटरी क्लब मार्फत विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले जातात, गरजू लोकाना मदत केली जाते.
No comments:
Post a Comment