तेऊरवाडीत होणार हरित क्रांती, घटप्रभेचे पाणी आले पठारावर, अशोक पाटील व कार्यसम्राट आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नांना यश - चंदगड लाईव्ह न्युज

27 June 2024

तेऊरवाडीत होणार हरित क्रांती, घटप्रभेचे पाणी आले पठारावर, अशोक पाटील व कार्यसम्राट आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नांना यश

 

तेऊरवाडीच्या पठारावर पडणारे घटप्रभेचे पाणी

तेऊरवाडी / एस के पाटील 

      तेऊरवाडी (ता. चंदगड) हे कोरडवाहू गाव म्हणून शासन दरबारी नोंद आहे. गावापासून दोन्ही बाजूना 4 किमी अंतरावर बारमाही वाहणाऱ्या नद्या. पण तेऊरवाडीत शेती पाण्याचा दुष्काळ आहे. निटूर तलावाचा थोडाफार शेतीला आधार . पूर्वेकडील शेतीला ताम्रपर्णी नदिच्या पाण्यावर होणारी शेती . पण गावच्या पश्चिम व उत्तरेकडील शेतीला पाणी नसल्याने बहुतांश शेती कोरडवाहू व पडीकच.

    पण या शेतीसाठी बारमाही पाणी आणण्याचा शद्ब कार्यसम्राट आमदार राजेश पाटील यांचे विश्वासू सहकारी सामाजिक कार्यकर्ते अशोक जोतिबा पाटील यानी तेऊरवाडी ग्रामस्थांना दिला होता . गावच्या विकासासाठी नेहमीच सिंहाचा वाटा उचलणाऱ्या श्री पाटील यानी हा शब्दही आज पूरा करून दाखवला .

 गेली अनेक वर्षे घटप्रभा नदितून गावाला पाणी आणण्यासाठी ते प्रयत्न शिल होते .

तेऊरवाडी चंदगड तालूक्यात तर घटप्रभा नदी गडहिंग्लज तालूक्यात यामुळे कार्य क्षेत्राबाहेर सिंचन क्षेत्र येत असल्याने शासनाकडून परवानगी मिळत नव्हती . यानंतर कार्यसम्राट आमदार राजेश पाटील यानी तत्कालीन 

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेकडे या नदिवरून पाणी योजनेसाठी प्रयत्न केले . या संबधीत सर्व कागदपत्रांची पूर्तता मा . अशोक पाटील यानी करून याचा शासन दरबारी वारंवार पाठपुरावा केला . आताचे उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यानी या सर्वांची दखल घेत घटप्रभा मध्यम प्रकल्पातून घटप्रभा प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रा बाहेरील तेऊरवाडी गावाला येथील पाणी वापरण्यास परवानगी दिल्याने तेऊरवाडी ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले . या योजनेला परवानगी मिळाली पण तीन किमी अंतरावरून तेही उंच पठारावर पाणी आणणे कठीण व खर्चिक काम होते . तेही आवाहन स्विकारत , येणाऱ्या असंख्य संकटावर मात करत अशोक पाटील यानी दिवसरात्र मेहनत घेऊन पाईपलाईनच्या कामाला सुरवात केली . यासाठी त्याना त्यांची मुले राकेश व जितेंद्र यानी मोलाची साथ दिली . १४ इंच इतकी मोठी पाईपलाईन टाकायला सुरवात केली . मध्ये लिप्ट साठी यंत्रणा बसवली . एका ठिकाणी 60 एच पी च्या तीन अशा 180 व लिप्ट च्या ठिकाणी परत 180 एचपी तीन मोटारी बसवण्यात आल्या . सर्व विद्युत यंत्रणा पूर्ण करण्यात आल्या .या पाण्याचा उपयोग 

तेऊरवाडीबरोबरच हडलगे गावच्या शेतकऱ्यांनाही होणार आहे . कोट्यावधी रुपये खर्च करून अशोक पाटील यानी अथक प्रयत्नानी या योजनेचे काम पूर्ण केले .

आज या पाणी योजनेची टेस्टींग घेण्यात आली . ती टेस्टीग ( चाचणी ) पूर्णपणे यशस्वी झाली . इतिहासात प्रथमच 

तेऊवाडीच्या पठाराने घटप्रभेचे पाणी पाहिले . आज या पठारावर घटप्रभेचे पाणी वाहताना पाहून डोळ्यात अश्रू तराळले . याचे सर्व श्रेय अशोक पाटील यानांच जाते . या पाईपलाईन कामासाठी कोल्हापूर येथोल बापा इंजिनिअर्सचे श्री पाटील व श्रो बागडे, विद्युत विभागाचे काम वेळेत पूर्ण करणारे शैलेश पेडणेकर, मोटर साठी सहकार्य केलेले श्री शेखर तसेच हडलगे येथील संभाजी कालकुंद्रीकर व सागर पाटील , हडलगे व तेऊरवाडी येथील शेतकरी व ग्रामस्थ तसेच बाहेरील विविध विभागाच्या अधिकऱ्यांनी , हितचिंतकानी व मदतकर्त्यांनी सहकार्य केल्याबद्दल अशोक पाटील आणि त्यांच्या सर्व कुटुंबियानी अगदी नम्रपणे आभार मानले आहेत . यामध्येच त्यांचा मोठेपणा दिसून येतो . गावाला दिलेला शब्द पूर्ण केला . आता तेऊरवाडीच्या पठारावरील माळ घटप्रभेच्या पाण्याने हिरवेगार होण्यास मदत होणार आहे . अशोक पाटील व कार्यसम्राट आमदार राजेश पाटील 

 यांच्या अतुलनिय कार्याबद्दल संपूर्ण तेऊरवाडी ग्रामस्थानी ऋण व्यक्त केले.


No comments:

Post a Comment