'महागाव डीएड कॉलेज' पहिल्या चार बॅचचे विद्यार्थी ४० वर्षानंतर स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र - चंदगड लाईव्ह न्युज

28 October 2025

'महागाव डीएड कॉलेज' पहिल्या चार बॅचचे विद्यार्थी ४० वर्षानंतर स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र

  


चंदगड : सी एल वृत्तसेवा 

      महागाव (ता. गडहिंग्लज) येथील व्ही. के. चव्हाण- पाटील कॉलेज ऑफ एज्युकेशन, डी. एड (अध्यापक विद्यालय) येथे प्रशिक्षण घेतलेल्या पहिल्या चार बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच आजरा येथील निसर्ग रिसॉर्ट येथे संपन्न झाला. तब्बल ४० वर्षांनी स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने सर्व वर्ग मित्र मैत्रिणी सहकुटुंब एकत्र आल्याने सर्वजण भारावून गेले होते. यात शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख पदावरून काहीजण सेवानिवृत्त झाले आहेत. तर काही अद्याप सेवेत आहेत. अशा सर्वांनी एकत्र येत कॉलेज जीवनातील आपल्या सुवर्ण क्षणांची देवाण-घेवाण केली. यावेळी जुन्या आठवणीत न्हाऊन निघालेल्या मित्र-मैत्रिणींच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. 

        २६ ऑक्टोबर २०२५ रोजी संपन्न झालेल्या या गेट-टुगेदर स्नेह मेळाव्यात डीएड कॉलेजमध्ये सन १९८५ ते ८७, १९८६ ते ८८, १९८७ ते ८९ व १९८८ ते ९० या काळात शिक्षण घेऊन शिक्षक झालेले प्रशिक्षणार्थी विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित तत्कालीन शिक्षक कुपेकर व महाजन यांचा सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने ह्रद्य सत्कार करण्यात आला.

   यावेळी बापू गोईलकर मिरज, शिवाजी सुतार कारदगा, शिवाजी बोलके महागाव, संजयकुमार जालिहाळे इचलकरंजी, शिवाजी पाटील.बानगे, मनोज माने हरोली, मोहन वर्णे इचलकरंजी, शिवाजी झाटे गारगोटी,आर सी पाटील जत, उत्तम पाटील बानगे, सुनील आमणे, महादेव कांबळे नांदणी, संदीप कागवाडे गडहिंग्लज, अनिल वीर इचलकरंजी, डी बी राऊत गिजवणे, विश्वनाथ पाटील सुंडी, मुरुकुटे, बी व्ही पाटील, चांदसो संदे, राजकुमार गुरव, सौ. कांचन गौरी सुतार गडहिंग्लज, श्रीमती पद्मजा यरनाळकर निपाणी, संगीता पाटील निपाणी, सौ रोजीना फर्नांडिस सांगली, सौ विनिता देसा निपाणी, सौ आशा अरबूने मुंबई, सोनाप्पा कोकितकर चंदगड, अनिल गोविंद शेंडे आजरा, विजयकुमार रामचंद्र पवार, धनाजी घाटगे सांगली, शशिकांत बागल, अशोक नौकुडकर चंदगड, ज्योतिबा मारुती नाकाडी, सौ सुनंदा लोखंडे, कृष्णा दाजीबा खाडे, राजू बनजवाडे, महादेव नाळे सांगरूळ आदी महाराष्ट्राच्या विविध भागात विखुरलेले माजी विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment