चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील आजी-माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशन सभासदांची बैठक नुकतीच पार पडली. नूतन पदाधिकारी निवडी संदर्भात झालेल्या या बैठकीत माडवळे (ता. चंदगड) येथील माजी सैनिक निवृत्ती लक्ष्मण मसुरकर यांची संघटनेचे नवे अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. मसूरकर यांची सैनिकांच्या अडीअडचणी वेळी धावून जाण्याची वृत्ती, लहान थोरांशी आदरयुक्त वर्तन व सर्व सामान्य सैनिकांना संघटित करून संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी गेली अनेक वर्षे करत असलेली धडपड पाहून त्यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. यावेळी जयवंत चांदेकर, राजाराम मोहनगेकर, गोपाळ आंबिटकर, परशराम पाटील, आनंद देसाई, नरसु पाटील, संजय गावडे, कपिल गवस, सुरेश दळवी, रणजीत गावडे, मंजुनाथ पाटील, मारुती नाईक, जीवनाप्पा पाटील, यशवंत धाऊस्कर, चंद्रकांत गवस, रमेश बोकडे आदींसह संघटनेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
निवडीनंतर नूतन अध्यक्ष मसुरकर व संघटनेच्या अन्य पदाधिकारी यांनी तालुक्याचे आमदार शिवाजीराव पाटील यांची सावर्डे निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आमदार पाटील यांनी मसूरकर यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी आजी-माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशनचे तालुक्यातील विविध गावचे अध्यक्ष, पदाधिकारी, आजी-माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवृत्ती मसुरकर यांच्या निवडीने तालुक्यातील आजी माजी सैनिकांत आनंद व उत्साहाचे वातावरण असून विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


No comments:
Post a Comment