![]() |
| दादू पाटील |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
मूळचे मलतवाडी व सध्या गोकुळनगर, ठाणे येथील उद्योजक दादू धोंडीबा पाटील (वय 78) यांचे अल्पशा आजाराने ठाणे येथे निवासस्थानी गुरुवारी (दि. 23) रोजी दुपारी निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवारी (दि. 24) सकाळी 9 वाजता मलतवाडी (ता. चंदगड) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ठाणे येथील दिवंगत माजी नगरसेविका शारदा पाटील यांचे ते पती होत तर ठाणे येथील नगरसेवक कृष्णा पाटील, भाजपचे ठाणे शहर व जिल्हा सरचिटणीस सचिन पाटील, तसेच ठाणे जनता सहकारी बँकेच्या अधिकारी शितल पाटील यांचे ते वडील होत. ठाणे येथील नगरसेविका नंदा कृष्णा पाटील यांचे ते सासरे होय. कडलगे बुद्रुक येथील इंजिनीयर पुंडलिक पाटील यांचे ते सासरे होत. शिवसेनेचे नेते दिवंगत आनंद दिघे यांच्यासोबत त्यानी काम केले आहे. ठाणे येथे अनेक क्रीडापटूंना त्यांनी आर्थिक आधार दिला आहे तसेच त्यांनी सिटीजन को-ऑपरेटिव्ह सोसायटी ही स्थापन केली होती.

No comments:
Post a Comment