कुदनूर येथे ताम्रकाठ दिवाळी अंकाचे प्रकाशन - चंदगड लाईव्ह न्युज

23 October 2025

कुदनूर येथे ताम्रकाठ दिवाळी अंकाचे प्रकाशन

 


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

        कुदनूर (ता. चंदगड) येथे 'ताम्रकाठ दिवाळी विशेषांक २०२५' चे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर येथे झालेल्या प्रकाशन कार्यक्रम प्रसंगी संपादक चंद्रकांत कोकितकर यांनी स्वागत केले. यावेळी राजीव गांधी पतसंस्थेचे चेअरमन पी. बी. पाटील, श्री लक्ष्मी पतसंस्थेचे संचालक चंद्रकांत निर्मळकर, सिद्राम गुंडकल, चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष, डिजिटल मीडिया जिल्हा कार्यकारिणी सदस्य व दैनिक पुढारी चे पत्रकार श्रीकांत पाटील, चंदगड पत्रकार संघाचे सदस्य व दै. तरुण भारत वार्ताहर सचिन तांदळे, राजेंद्र हदगल, कृष्णा मांडेकर, मारुती तळवार, परशुराम चौगुले, दयानंद जाधव आदींची उपस्थिती होती.

       यंदा ताम्रकाठ या दिवाळी अंकाचे सलग सातवे वर्ष असून दर्जेदार भावस्पर्शी कथा, हृदयस्पर्शी कविता, ठळक वाचनीय मुद्रण, यांनी अंक सजलेला असून वाचकांना यातील कथा कविता नक्कीच आवडतील अशा आशयाच्या कौतुक व शुभेच्छा शुभेच्छा यावेळी बोलताना पी. बी. पाटील, सचिन तांदळे, मारुती तळवार, राजेंद्र हदगल आदींनी दिल्या. संपादक चंद्रकांत कोकितकर यांनी आभार मानले. 

No comments:

Post a Comment