चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
केरवडे (ता. चंदगड) येथील रहिवाशी, हॉटेल व्यवसायिक तसेच मुंबई, डीलाई रोड येथील चंदगड पंचक्रोशी को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन सोमनाथ रवळू करंबळकर ( वय 72) यांचे गुरुवारी (दि. 23) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर केरवडे येथे शुक्रवारी (दि. 24) सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. चंदगड पंचक्रोशी को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे माजी चेअरमन सट्टूप्पा करंबळकर यांचे ते भाऊ होत. मुंबईतील हॉटेल व्यवसायिक सुनील करंबळकर यांचे ते वडील होत.

No comments:
Post a Comment