चंदगड शहारातून शोभा यात्रा काढण्यात आली. यावेळी तहसिलदार राजेश चव्हाण, पो. नि. विश्वास पाटील, नायब तहसिलदार हेमंत कामत यांच्यासह पदाधिकारी व विद्यार्थ्यांचा सहभाग.
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शतकोत्तर सुवर्णजयंती महोत्सवानिमित्त तहसील कार्यालय चंदगड व सर्व प्रशासकीय विभाग चंदगड यांचेवतीने पूर्ण सप्ताह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याची सुरवात दि २५/६/२४ पासून करण्यात आली.
दि २५/६/२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजता राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर शाहीर श्रीपती कांबळे यांचा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जीवनावरील पोवाडा व डॉ. नवनाथ शिंदे यांचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य याबाबत व्याख्यान आयोजित केले होते.
दि २६/६/२४ रोजी सकाळी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून तहसील कार्यालय चंदगड ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बाजारपेठेमधून संभाजी महाराज चौकातून पंचायत समिती चंदगड येथेपर्यंत शोभा यात्रा काढण्यात आली.
धनंजय विद्यालय नागनवाडी यांचेकडून झांज पथक व उर्दू शाळा चंदगड यांच्याकडून छत्रपती शाहू महाराज यांची वेशभूषा करणेत आलेले होते तसेच कन्या विद्या मंदिर चंदगड, कुमार विद्यामंदिर केंद्रीय शाळा चंदगड,माडखोलकर हायस्कूल, रवळनाथ विद्यालय चंदगड यांनी शोभा यात्रेमध्ये सहभाग घेण्यात आला होता. शोभा फेरी नंतर शिरगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सर्व शासकीय विभागांचे कार्यालय प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. तसेच विविध शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment