चंदगड तालुका पंचायत समिती स्तरावरील कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रशांत मारुती पाटील यांची एकमताने निवड - चंदगड लाईव्ह न्युज

29 June 2024

चंदगड तालुका पंचायत समिती स्तरावरील कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रशांत मारुती पाटील यांची एकमताने निवड

प्रशांत पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    चंदगड तालुक्यातील शिक्षक, ग्रामसेवक, पंचायत समिती कर्मचारी आरोग्यकर्मचारी, मैलकुली अशी विविध क्षेत्रातील सभासद असणारी कर्मचारी पतसंस्था या संस्थेच्या चेअरमन पदी सहकारतील अभ्यासू, संघटन कौशल्य असलेले व शिक्षक्षक समितीचे माजी सरचिटणीस नेते प्रशांत पाटील यांची चेअरमनपदी निवड तर व्हा. चेअरमन पदी स्नेहल वाघमारे यांची एकमताने निवड. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती ए. एस. काटकर यानी काम पहिले.
      नूतन चेअरमन यांनी आपल्या मनोगतात सर्वांचे आभार मानले तसेच रौप्यमहोत्सवी वर्षात सभासद कल्याण योजना राबवणार असल्याची  असल्याची ग्वाही दिली. आभार संचालक सतीश माने यानी मानले.
     या निवडीसाठी समिती तालुका अध्यक्ष धनाजी पाटील, शिक्षक बँक संचालक बाबुराव परीट, चेअरमन राजू जोशी, जिल्हा उपाध्यक्ष विनायक प्रधान व सर्व संचालक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment