तेऊरवाडी /सी एल वृत्तसेवा
मनामध्ये जीद्द आणि परीस्थितीची जाणीव असेल तर कोणातीही कला अवगत करून उपजिविका करता येते हे सर्वांना माहितच आहे. सुळे (ता. आजरा) येथील कु साक्षी महादेव कटाळे या युवतीने याच जिद्दीच्या जोरावर पुरुषांची मक्तेदारी असणारा फेटे बांधणीच्या व्यवसायात नावलौकीक मिळवतात. आतापर्यंत हजारो मान्यवरांना विविध कार्यक्रमात अनेक प्रकारच्या कोल्हापूरी फेट्यांची बांधणी केली आहे.
आपले वडील महादेव कटाळे यांचा वारसा आणि परंपरा साक्षीने जपल्या आहेत . नेसरी महाविद्यालयात शिकणाऱ्या साक्षीने कोणत्याही प्रकारची लाज मनामध्ये न बाळगता फेटे बांधण्याची कला आपल्या वडीलांच्या कडून अवगत केली. पंजाबी, गुजराती, बिहारी, मेवाडी आदि फेटे बांधताना साक्षीचा तर कोल्हापूरी फेटा बांधण्या मध्ये मोठा हातखंडा आहे. अगदी एका मिनिटात फेटा बांधण्याची कला साक्षीकडे आहे. पुरुषांबरोबर स्त्रिया नाही ती फेटे बांधते. जराही न थकता २०० ते 300 फेटे बांधण्याचे कसब साक्षीकडे आहे. साक्षीचे वडील महादेव यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, सचिन तेंडूलकर मुकेश अंबानी, मनोहर जोशी, सचिन आहिर, आहे महेंद्रसिंग धोनी आदि लाखो मान्यवरांना जसे फेटे बोधले आहेत. तसेच साक्षी हिने सुद्धा विविध मंत्री, खेळाडू, चित्रपट सृष्टीच्या अनेक कलाकांराना फेटे बांधून सर्वाकडून वाहवा मिळवली आहे. या व्यवसायातून व कलेतून तीला १०० रुपयापासून ते 5000 रुपयापर्यंत मानधन मिळते. हे मानधन शिक्षण व घरखर्च चालवण्यासाठी उपयोगी ठरते. या फेटे बांधण्याच्या कलेमुळे साक्षीला व तीच्या वडीलांना कर्नाटक, मुंबई, गोवा, हैदराबाद, कोलकता, अहमदाबाद, बनारस, बीड, लातूर, पुणे आदि शहरातून खास फेटे बांधण्यासाठी बोलवले जाते. या कलेबद्दल तीचा अनेक मान्यवरांच्या हस्ते सन्मानही करण्यात आला आहे. वडीलांच्या पायावर पाय ठेवत साक्षीही तितक्याच तत्परतेने फेटे बांधत असल्याने या फेटेवाल्या साक्षीची चर्चा गडहिंग्लज आजरा चंदगड तालुक्या बरोबरच कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातही चालू आहे.
No comments:
Post a Comment