तेऊरवाडी गावामध्ये चाळेबा गणेश हत्तीचा फेरफटका, ग्रामस्थांची पळापळ - चंदगड लाईव्ह न्युज

26 May 2025

तेऊरवाडी गावामध्ये चाळेबा गणेश हत्तीचा फेरफटका, ग्रामस्थांची पळापळ

 


तेऊरवाडी /सी एल वृत्तसेवा

    गेले महिनाभर कर्नाटकातील बेकिनकेरे व महाराष्ट्रातील महिपाळगड परिसरात वावरणाऱ्या चाळोबा गणेश हत्तीने परतीचा प्रवास चालू केला असून आज सकाळी ७ च्या सुमारास तेऊरवाडी (ता. चंदगड) या गावामध्ये या हत्तीने फेरफटका मारला.

        मार्च व एप्रिल महिन्यात हा हत्ती तेऊरवाडी चिंचणे परिसरात ठाण मांडून राहिला होता. या परिसरातील ऊस पिकांचे, केळी व नारळीच्या झाडांचे नुकसान करत या हत्तीने कर्नाटकातील बेकिनके रे परिसरात मोर्चा वळवला होता. या परिसरात कार, ट्रॅक्टर, बैलगाडी आदि गाड्यांचे प्रचंड नुकसान केले. आज दि. २७ रोजी हा हत्ती तेऊरवाडी गावामध्ये दाखल झाला. येथील कोवाड तेऊरवाडी रस्त्यालगत फडेवाडी नवीन वसाहतीत असणाऱ्या तलावात उतरून नंतर गावंदर शेतातून डोंगराच्या दिशेने निघून गेला. सकाळी सकाळी गावामध्ये हत्ती दाखल झाल्याने शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. सध्या या हत्तीने आजऱ्याच्या दिशेने परतीच्या प्रवासाला सुरवात केली असली तरी तेऊरवाडी - हडलगे जंगलात बांबू असल्याने पुन्हा एकदा हा हत्ती येथे स्थिरावण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment