![]() |
| कुदनूरच्या लक्ष्मी पतसंस्था वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना सचिव मौला जमादार, यावेळी उपस्थित चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक मंडळ |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
सहकार क्षेत्रात पन्नास वर्षाहून अधिक काळ सभासदांच्या विश्वासास पात्र राहिलेल्या कुदनूर (ता. चंदगड) येथील श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीत पार पडली. यावेळी सभासदांसाठी १५ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन यशवंत रामचंद्र बामणे होते.
स्वागत संचालक चंद्रकांत बाबू निर्मळकर यांनी केले. सचिव मौला मिरा जमादार यांनी प्रास्ताविकात संस्थेचा इतिहास व प्रगतीचा आढावा मांडला. सामाजिक बांधिलकी जपत संस्थेच्या वतीने इयत्ता १० वी बोर्ड परीक्षेतील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. संस्थेच्या वाटचालीत मोलाचे योगदान दिल्याबद्दल सेवानिवृत्त व्यवस्थापक बाळकृष्ण केदारी नागरदळेकर यांचा सपत्नीक सत्कार संचालिका सौ. अश्विनी अशोक आंबेवाडकर व श्री अशोक आंबेवाडकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेचे सभासद व राजीव गांधी पतसंस्थेचे कोवाड शाखा सेवानिवृत्त मॅनेजर शामराव महादेव मुतकेकर यांचाही सन्मान करणेत आला.
विषय पत्रिकेवरील सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. पदाधिकाऱ्यांच्या पारदर्शक कारभारामुळे संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे मत सभासदांनी व्यक्त केले. यावेळी
झालेल्या चर्चेत सभासद बी. के. पाटील, प्रकाश हेब्बाळकर, रामचंद्र बामणे, परसू खंदाळे, कृष्णा मांडेकर, बाबाजान कालकुंद्रीकर, निंगाप्पा आंबेवाडकर, शिवाजी आंबेवाडकर यांनी सहभाग घेत अभ्यासपूर्ण सूचना मांडल्या. सभासदांच्या प्रश्नांना व्यवस्थापक तुकाराम दत्तू मल्हारी यांनी समाधानकारक उत्तरे दिली. यावेळी चेअरमन यशवंत बामणे यांनी मनोगत व्यक्त केले. जेष्ठ संचालक सिद्राम रामू गुंडकल यांनी आभार मानले. यावेळी सर्व संचालक, कर्मचारी व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

No comments:
Post a Comment